Saturday, 2 May 2020

नवोपक्रम:-

नवोपक्रम:-
      नवोपक्रमाविषयी माहिती जाणून घेऊ ,कसा लिहावा.सुरुवात, उद्दीष्टे,कार्यवाही, यशस्विता . अध्ययन, अध्यापन करतांना  समस्या निर्माण झाली की आपण नवीन उपक्रम करतो.मुलांच्या प्रगतीसाठी .पण तो केलेला उपक्रम लिहून ठेवत नाही.दिशा नवोपक्रम ची ह्या पुस्तकात माहिती छान आहे.

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे:
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१.नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२.नवोपक्रमाची गरज व महत्त्व - उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ.चा तपशील.

३.नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा,कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार,याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४.नवोपक्रमाचे नियोजन -
i) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
ii) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
iii) आवश्यक साधनांचा विचार
iv) करावयाच्या कृतींचा क्रम
v) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
vi) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
vi) उपक्रमासाठी इतरांची मदत
viii) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे.

५.नवोक्रमाची कार्यपद्धती -
I) पूरस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी II) कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन
III) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
IV) कार्यवाहीत आलेल्या अडचणी
V) माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६.नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडवी.

७.समारोप - आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता कसा झाला, हे विशद करावे.

८.संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

No comments:

Post a Comment