Friday, 25 June 2021

मोबाईल हरवल्यास/ चोरीला गेल्यास काय करावे?

 अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत हे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, या गरजांमध्ये आता मोबाईलचा mobile देखील समावेश होईल की काय असंच वाटू लागलं आहे. आजकाल तुम्ही कुठेही पाहा अगदी लहानांच्या हातातही मोबाईल mobile पाहायला मिळतो. अनेकजण तर रात्री झोपतानादेखील फोन उशाशी घेऊन झोपतात. त्यामुळे मोबाईल म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण वस्तू झाली आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये महत्त्वाचे ऑनलाइन डॉक्युमेंट्स, मेल किंवा अन्य काही फाईल्स असतात. त्यामुळे हा फोन जास्त जपला जातो. परंतु, तुमचा हा फोन एखाद्या वेळी हरवला lost किंवा चोरीला stolen गेला तर? अशावेळी काय कराल? घाबरु नका

फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तो ब्लॉक कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात. (how-to-block-a-lost-or-stolen-mobile-find-out)

 *मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं*

मोबाईल गहाळ झाल्यावर आपण प्रथम जीपीएस लोकेशन, सीम कार्ड आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग पोलिस तक्रार करतो. ही सगळी प्रोसेस करेपर्यंत बराच वेळ निघून गेला असतो. परंतु, आता फोन गहाळ झाल्यावर तुम्ही घरबसल्या तो ब्लॉक करु शकता.

फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्ही घरी बसून आयएमईआय क्रमांकाच्या माध्यमातून तो ब्लॉक करु शकता. तसंच तो सध्या कोणत्या लोकेशनला आहे हेदेखील ट्रॅक करु शकता.   

*असा करा फोन ब्लॉक*:-

प्रथम Central Equipment Identity Register (CEIR) या संकेतस्थळावर जा. त्यानंतर https://ceir.gov.in/Home/index.jsp या लिंकवर क्लिक करून लॉगइन करा. त्यानंतर CEIR पोर्टलवर हरवलेल्या फोनचा IMEI नंबर टाईप करा व CEIR सर्व्हिसेसमध्ये हरवलेल्या मोबाईलला ब्लॉक करण्याच्या ऑप्शनची निवड करा. हा ऑप्शन निवडल्यानंतर तेथे फोनसंबंधित विचारल्या गेलेल्या प्रश्नांची नीट माहिती भरा. तसंच या पर्यायामध्ये हरवलेल्या फोनविषयी, सिम कार्ड, पोलिसांत तक्रार केली असेल तर त्याबाबत माहिती देऊन रिक्वेस्ट सबमिट करा.

*IMEI नंबर कसा शोधायचा?*

हरवलेल्या मोबाईलचा IMEI नंबर तुम्हाला फोनच्या बीलवर किंवा मोबाईलच्या बॉक्सवर सापडेल. हा नंबर १५ अंकी असतो. या नंबरच्या आधारे तुम्ही फोन ब्लॉक करु शकता.

*CEIR नेमकं काय आहे?*

भारत सरकार व दिल्ली पोलीस, डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट टेलिमेटिक्स (CDOT) यांच्या सहयोगाने CEIR हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे.

सौजन्य :- सकाळ वृत्तपत्र लेख.