🛣️ *'बुद्रुक व खुर्द' या शब्दांचा अर्थ काय ?
🤔 महाराष्ट्र भरात फिरत असताना बऱ्याच गावांच्या नावापुढे बुद्रुक व खुर्द हे शब्द लावलेले असतात. परंतु याचा नेमका अर्थ काय हे ठाऊक नसते. चला त्यांचा अर्थ समजून घेऊया...
🔍 *बुद्रुक व खुर्द म्हणजे काय ?*
🛑 एखाद्या रस्त्यामुळे, नदी किंवा ओढ्यामुळे गावाचे दोन भाग पडत. ते दोन्ही भाग समान नसल्यामुळे गावाच्या मोठ्या भागाला बुजुर्ग (फारशी अर्थ मोठा) आणि छोट्या भागाला खुर्द (फारशी अर्थ छोटा किंवा खुद्द) म्हटले जाऊ लागले.
🛑 पुढे बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा प्रचलित झाला. त्यामुळे आज आपल्याला अनेक गावांच्या नंतर बुद्रुक किंवा खुर्द असे नाव लागलेले दिसून येते.
🛑 शिवकाळापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, मुगलशाही, कुतुबशाही यांचा मोठा अंमल होता. त्यामुळे मराठी भाषेवरही इस्लामी भाषेचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
🗣️ या शासन काळात गावांना बुद्रुक आणि खुर्द अशी नावे देण्यात आली.
🔍 *मौजे आणि कसबा म्हणजे काय ?*
▪️काही गावांच्या आधी मौजे आणि कसबा अशी नावे लावलेलीही दिसून येतात.
▪️मौजे हा अरबी शब्द असून मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दावरून हा शब्द आला.
▪️याचा अर्थ गाव असाच होतो. तर कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतील Quasah या शब्दावरून आला आहे.
▪️मुघल आक्रमणाच्या काळात हे शब्द भारतात आले. कसबा याचा अर्थ बाजारपेठेचे ठिकाण असा होतो.
▪️हा शब्द महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही वापरलेला दिसून येतो.