Tuesday, 21 August 2018

गंमत शून्याची...

एक ‘ट्रिलियन’ म्हणजे किती ?
त्यात एकावर किती शून्ये येतात ?

थांबा ! थांबा ! सहस्र, कोटी किंवा शंभर अब्ज असे एकक वापरून सांगायचे नाही. भारतीय दशमान पद्धत वापरून अथवा मराठी शब्द वापरून सांगायचे. विचार करा. जमतंय का ?

नाही जमत ना !

मग एकावर पन्नास शून्ये किंवा एकावर शहाण्णव शून्ये म्हणजे किती, हे सांगताच यायचे नाही. मग अशा संख्यांचा उच्चार तरी कसा करायचा ?

पण भारतीय अंकगणितात याला उत्तर आहे.

अतिप्राचीन भारतात गणितावर बरेच संशोधन झाले आहे. त्याविषयी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना ‘अंक’ म्हटले आहे. हे अंक म्हणजे (१ ते ९ आणि ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

दशमान पद्धतीची संकल्पना ‘आसा’ या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात रहाणार्‍या भारतीय गणिततज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत पालटेल, या ‘आसा‘ यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे ‘हिंदासा’ नावाने ओळखले जाऊ लागले.साधारणतः वर्ष ५०० मध्ये आर्यभट्टांनी दशमान पद्धती सगळीकडे रुजवली. त्यांनी शून्यासाठी ‘ख’ या शब्दाचा वापर केला. नंतर त्याला ‘शून्य’ असे संबोधले गेले.

भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक ऐकिवात असणे इंग्रजीत संख्यांना सलग संज्ञा नाहीत. ‘थाऊजंड’, ‘मिलियन’, ‘बिलियन’, ‘ट्रिलियन’, ‘क्वाड्रिलियन’ अशा एक सहस्रांच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक अनेकदा ऐकिवात असतात.
उदा. खर्व, निखर्व, पद्म, महापद्म अगदी परार्धापर्यंत.
अर्थात आपण केवळ नावे ऐकून आहोत.त्यानुसार नेमकी संख्या सांगणे शक्य होत नाही; कारण त्याची आपल्याला सवयच नाही.

४. भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडेविविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक
१० दहा
१०० शंभर
१००० सहस्र
१०,००० दश सहस्र
१,००,००० लाख
१०,००,००० दहा लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दहा कोटी
१,००,००,००,००० अब्ज
१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)
१,००,००,००,००,००० निखर्व
१०,००,००,००,००,००० पद्म
१,००,००,००,००,००,००० दशपद्म
१,००,००,००,००,००,००,०० नील
१०,००,००,००,००,००,००,०० दशनील
१०,००,००,००,००,००,००,००० शंख
१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

 १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००.
म्हणजेच एकावर ९६ शून्य किंवा १ X १०^९६.

हि संख्या कोणालाही सांगता येणार नाही.
भारतीय गणितानुसार हि संख्या आहे - #एक_दशअनंत

भारतीय गणितानुसार त्याचे मापन खालील प्रकारे केले जाते -

••• एकक,
••• दशक,
••• शतक,
••• हजार,
••• दशहजार,
••• लक्ष,
••• दशलक्ष,
••• कोटी,
••• दशकोटी,
••• अब्ज,
••• दशअब्ज,
••• खर्व,
••• दशखर्व,
••• पद्म,
••• दशपद्म,
••• नील,
••• दशनील,
••• शंख,
••• दशशंख,
••• क्षिती,
••• दशक्षिती,
••• क्षोभ,
••• दशक्षोभ,
••• ऋद्धी,
••• दशऋद्धी,
••• सिद्धी,
••• दशसिद्धी,
••• निधी,
••• दशनिधी,
••• क्षोणी,
••• दशक्षोणी,
••• कल्प,
••• दशकल्प,
••• त्राही,
••• दशत्राही,
••• ब्रह्मांड,
••• दशब्रह्मांड,
••• रुद्र,
••• दशरुद्र,
••• ताल,
••• दशताल,
••• भार,
••• दशभार,
••• बुरुज,
••• दशबुरुज,
••• घंटा,
••• दशघंटा,
••• मील,
••• दशमील,
••• पचुर,
••• दशपचुर,
••• लय,
••• दशलय,
••• फार,
••• दशफार,
••• अषार,
••• दशअषार,
••• वट,
••• दशवट,
••• गिरी,
••• दशगिरी,
••• मन,
••• दशमन,
••• बव,
••• दशबव,
••• शंकू,
••• दशशंकू,
••• बाप,
••• दशबाप,
••• बल,
••• दशबल,
••• झार,
••• दशझार,
••• भिर,
••• दशभीर,
••• वज्र,
••• दशवज्र,
••• लोट,
••• दशलोट,
••• नजे,
••• दशनजे,
••• पट,
••• दशपट,
••• तमे,
••• दशतमे,
••• डंभ,
••• दशडंभ,
••• कैक,
••• दशकैक,
••• अमित,
••• दशअमित,
••• गोल,
••• दशगोल,
••• परिमित,
••• दशपारीमित,
••• अनंत,
••• दशअनंत


Friday, 6 July 2018

गाणे मूळाक्षरांचे



📙📚 *गाणे मुळाक्षरांचे*📚📙
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभाळात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहामृग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे
📚📚

Sunday, 8 April 2018

मराठी विलोमपद वाक्य

सहज गंमत म्हणून
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना
👇👇👇👇👇👇
१. चि मा का य का मा ची
२. भा ऊ त ळ्या त ऊ भा
३. रा मा ला भा ला मा रा
४. का का, वा च वा, का का
५. का का, वा ह वा ! का का
६. ती हो डी जा डी हो ती
७. तो क वी डा ल डा वि क तो
८. तो क वी मो मो वि क तो
९. तो क वी सा मो सा वि क तो
१०. तो क वी को को वि क तो
११. तो क वी ई शा ला शा ई वि क तो
१२. तो क वी री मा ला मा री वि क तो
१३. तो क वी वा मा ला मा वा वि क तो
१४. तो क वी व्हि टी ला टि व्ही वि क तो
१५. तो क वी वि की ला कि वी वि क तो
१६. तो क वी च हा च वि क तो
१७. तो क वी का वि क तो?
१८. तो क वी लि ली वि क तो
१९. तो क वी ऊ मा ला मा ऊ वि क तो
२०. तो क वी ठ मा ला मा ठ वि क तो
२१. तो क वी क णि क वि क तो
२२. तो क वी बे ड व ड बे वि क तो
२३. तो क वी ठ मी ला मी ठ वि क तो
२४. म रा ठी रा म
२५. तो क वी च क्का च वि क तो
२६. तो क वी हा च च हा वि क तो
२७. तो क वी रा शी ला शि रा वि क तो
२८. तो क वी टो मॅ टो वि क तो
२९. टे प आ णा आ प टे
३०. शि वा जी ल ढे ल जी वा शी.
३१. स र जा ता ना प्या ना ता जा र स.
३२. हा च तो च हा

*🙏🏼(मराठी भाषा मित्रमंडळ) 🙏🏼*

Monday, 12 March 2018

*भाषेचे नवरस*

*मराठी व्याकरण - भाषेतील रस*

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

Wednesday, 14 February 2018

शृंगार मराठीचा...

✍🏼
मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल.
वाचाच, मस्त आहे..!

🌹

*शृंगार मराठीचा*                 

_*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी |             

_*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके
सुंदर तव कानी |           

नाकावरती _*स्वल्पविरामी*_
शोभे तव नथनी |             

_*काना*_-काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |     

_*वेलांटी*_चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |               

_*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |         
   
_*उद्गारा*_चा तो गे छल्ला
लटके कमरेला |                 

_*अवतरणां*_च्या बटा
मनोहर भावती चेहर्‍याला |   
     
_*उ*_काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |       

_*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥

*अनामिका*



🌹