*युडायस म्हणजे काय?*
U-DISE चा लॉंगफॉर्म Unified District Information System for Education असा आहे. आपण सर्वजण दरवर्षी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती युडायस मध्ये भरून देतो. आणि आपल्या शाळेची माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते त्यामुळे आपल्याला देशातील कोणत्याही शाळेची युडायस मधील माहिती किंवा *स्कूल रिपोर्ट कार्ड* या वेबसाईटवर मिळू शकतात.
संपूर्ण देशात कोणत्याही शासन मान्यता प्राप्त शाळेला युडायस असतो. मग ती शाळा कोणत्याही प्रकारची, व्यवस्थापनाची, माध्यमाची असो किंवा खाजगी असो, कोणताही युडायस हा अकरा अंकी असतो या अकरा अंकांची माहिती आपण पाहूया.
Udise मधील अकरा अंकांचे पाच भाग पडतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
माझ्या जि प प्राथ शाळा ढोराळे शाळेचा युडायस 27300203201 असा आहे आणि तो अकरा अंकी आहे . आणि याचे पाच भाग पुढीलप्रमाणे आहेत.
27,30,02,032,01 म्हणजे देशातील कोणत्याही शाळेचा युडायस हा अकरा अंकीच असतो
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*27:-*27 या अंकाकडे पाहिलं की लगेच ही शाळा महाराष्ट्र राज्यातील आहे हे लक्षात येते.01 नंबर हा जम्मू काश्मीर या राज्याचा असून 36 हा नंबर तेलंगणा या राज्याचा आहे. म्हणजे 01 ते 36 इतके नंबर आपल्या देशात राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना देण्यात आले आहेत.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*30:-* हा अंक जिल्ह्याचा क्रमांक दर्शवितो. 30 या क्रमांकाचा जिल्हा सोलापूर असून राज्यात 01 ते 35 क्रमांक जिल्ह्यांना देण्यात आले आहेत . 01 नंबर नंदूरबार जिल्ह्याचा असून 35 नंबर सांगली जिल्ह्याचा आहे. पालघर या जिल्ह्याची माहिती मिळाली नाही.सध्या पालघर जिल्ह्याचा व ठाणे जिल्ह्याचा कोड एकच असावा. असे वाटते.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*02:-* वरील युडायसमध्ये 02 हा अंक महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता अक्कलकोट तालुक्याला 01 तर दक्षिण सोलापूर तालुक्याला 11 क्रमांक देण्यात आला आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*032:-* वरील युडायस मधील 032 हे अंक बार्शी तालुक्यातील गावाचा क्रमांक दर्शवितात. 032 क्रमांक ढोराळे या गावाचा असून बार्शी तालुक्यातील सर्व गावांना 001 ते 140 पर्यंत क्रमांक दिले आहेत. 001 क्रमांक आगळगाव या गावाचा असून 140 क्रमांक राळेरास केंद्रातील तडवळे या गावाचा आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*01:-* वरील युडायस मधील शेवटचे दोन अंक हे त्या गावातील शाळेचा क्रमांक दर्शवितात.एखाद्या गावात अनेक शाळा असू शकतात त्यामुळे एकाच गावातील अनेक शाळांना 01 ते 99 पर्यंत क्रमांक दिलेले असू शकतात. हे त्या गावातील शाळांच्या संख्येवर अवलंबून असते. परंतु निरीक्षणातून असे लक्षात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांना बहुधा 01 क्रमांक देण्यात आलेला असून खाजगी किंवा इतर व्यवस्थापनाच्या शाळांना पुढील क्रमांक देण्यात आला आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
📗📕📋 *रंजक माहिती*📋📕📗
वरील माहिती वाचल्यावर लक्षात येईल की 01010100101 हा युडायस नंबर आपल्या भारत देशातील कोणत्यातरी शाळेचा असेल, तर हे बरोबर आहे. हा युडायस जम्मू- काश्मीर या राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील चामकोटे तालुक्यातील टीतवाल या केंद्रातील BHSS TEETVWAL या शाळेचा आहे आणि ती देशातील पहिली शाळा आहे असे म्हणू शकतो तर 36104602307 हा युडायस आपल्या देशातील शेवटचा युडायस असून तो तेलंगणा राज्यातील खम्मम या जिल्ह्यातील येरूपेलम तालुक्यातील व केंद्रातील REMIDICHERLA या गावातील MPPS रामपूरम या शाळेचा आहे. तसेच आपल्या राज्याचा विचार करता 27010100101 हा युडायस नंबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्यातरी शाळेचा असू शकतो. तर वरील 27010100101 हा युडायस क्रमांक हा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावातील जि. प. प्राथ.शाळा धानोरा या शाळेचा आहे आणि हा आपल्या राज्यातील पहिला युडायस म्हणू शकतो आणि 27351104501 हा युडायस शेवटच्या शाळेचा क्रमांक म्हणू शकतो.तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिरगाव या गावातील जि प प्राथ. शाळेचा आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*आंतरजालातून साभार*
*सौजन्य:-udise.in आणि schoolripoartcards.in*
*वरील सर्व माहिती ही संबंधित वेबसाईटवरून घेतली असून जर माहितीत काही चूक झाली असल्यास ती लक्षात आणून देण्यास हरकत नाही.